कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वच्छता रॅली
महात्मा गांधींच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ही स्वच्छता रॅली आयोजित केली होती.
महाविद्यालय ते हन्नूर चौक, एसटी स्टँड, कारंजा चौक, बाजारपेठ मार्गे श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. ठीक ठिकाणी विद्यार्थ्यांनी नागरिकांना प्रबोधन केले.
विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा प्लास्टिक व घनकचरा गोळा करून तो कचरापेटीत टाकला, रॅलीचे नियोजन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले. प्राध्यापक सौरभ भस्मे डॉ बाळासाहेब पाटील, प्राध्यापिका प्राची गणेचारी, सौंदर्या शास्त्री, विद्याश्री बिराजदार, ऐश्वर्या तारापुरे, जनाबाई चौधरी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, पुनम कोकळगी, रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी उपक्रमाबद्दल एन एस एस स्वयंसेवकाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी घोषणा
रस्त्यावर कचरा टाकू नका, ओला व सुका कचरा वेगळा करा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, प्लास्टिकचा अनावश्यक वापर करू नका अशा लक्षवेधी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या, त्यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता, नागरिकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
.png)
No comments:
Post a Comment