इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय मातीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय मातीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार

इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय मातीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  बाभुळगाव, ता. पंढरपूर, येथील पै.रविराज चव्हाण यांनी इंग्लंड येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मातीवरील कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल कल्याणराव काळे यांच्या हस्ते पंढरपूर येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला.

बाभुळगाव सारख्या ग्रामीण भागात सराव करून पै.रविराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील नावलौकिक आणखी वाढवला आहे असे मत कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले. यावेळी कठीण परिस्थितीतून मुलांना चांगले घडविलेबद्दल त्यांचे वडील पै.राजाभाऊ चव्हाण यांचा यथोचित सत्कार जेष्ठ संचालक मारुती भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारतनाना कोळेकर, मोहन नागटिळक, दिनकर कदम जयसिंह देशमुख, शंकर महाराज चव्हाण, दिनकर डोंगरे, भिमा सह.सा.का.संचालक बिभिषण वाघ, पै.भारत पाटील यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, व्हा.चेअरमन हरिभाऊ मुजमुले, संचालक संजय पाटील, रमेश नागणे, अर्जुन चव्हाण, पै.भिमाशंकर माळी, पै.अंकुश चव्हाण, पै.अमित पाटोळे, सज्जन भायगुडे, सचिन गाजरे, उपस्थितीत होते

पै.रविराज चव्हाण  ‘वसंत केसरी’ पदाचे मानकरी आहेत.  त्यांनी आपल्या कुस्ती कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मातीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्यांनी आपल्या गावासह, पंढरपूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलेले आहे असे बाळासाहेब काळे यांनी सांगितले.

--

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages