पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय संदर्भात लवकरच बैठक लावू- उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 31, 2026

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय संदर्भात लवकरच बैठक लावू- उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय संदर्भात लवकरच बैठक लावू- उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील
राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-   पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थिती, रुग्णांवरील उपचारातील कथित हलगर्जीपणा, शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छतेचा अभाव तसेच रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविण्याच्या प्रकारांची सखोल चौकशी करून दोर्षीवर कारवाई करण्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदन दिले. ते निवेदन  सोलापूरचे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी स्वीकारले. त्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय संदर्भात लवकरच बैठक लावून आपल्या मागणी संदर्भात लवकर बैठक घेऊन कोण दोषी आढळ्यास कारवाई करू असे अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी आश्वासन दिले.
या निवेदनाची प्रत आरोग्यमंत्री, आयुक्त व आरोग्य संचालक यांना  निवेदन मेल द्वारे पाठविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष मुहम्मद उस्ताद, सरचिटणीस सारंग महामुनी, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप तांदळे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, 
पंढरपूर शहर व तालुक्यातील तसेच परिसरातील हजारो सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेक गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिक शासकीय रुग्णालयावर अवलंबून असतात. शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना प्रत्यक्षात या रुग्णालयातील कामकाजाबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना योग्य वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याच्या, आवश्यक उपचार मिळत नसल्याच्या तसेच गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात  दाखल केल्यानंतरही आवश्यक वैद्यकीय देखरेख वेळेवर मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत असून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
या संदर्भात खालील बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत चौकशी करावी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ तसेच कर्करोग उपचाराशी संबंधित तज्ज्ञांची नियुक्ती असल्याचे सांगितले जाते. मात्र संबंधित डॉक्टर प्रत्यक्षात किती दिवस रुग्णालयात उपस्थित राहतात, त्यांची ड्युटी किती असते आणि रुग्णांना किती वेळा सेवा देतात, याची बायोमेट्रिक हजेरी व ड्युटी रजिस्टरच्या आधारे तपासणी करण्यात यावी.. शस्त्रक्रिया व उपचारांचा लेखाजोखा मांडण्यात यावा. प्रमुख मागण्या :1) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र समितीमार्फत अचानक तपासणी करण्यात यावी.
2) मागील दोन वर्षांतील सर्व विभागांच्या उपचारांचा, शस्त्रक्रियांचा व रेफरलचा अहवाल तपासण्यात यावा.
3). वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची व कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी.
4). रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे व खउण सुविधांचे ऑडिट करण्यात यावे.
5) रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविण्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात यावी.
6). चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.. 7) रुग्णालयातील प्रत्येक विभागाचे डॉक्टरांचे ड्युटी वेळापत्रक व तक्रार निवारण अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक नागरिकांसाठी दर्शनी भागात लावण्यात यावा.
8) . या तक्रारीवर केलेल्या चौकशीचा लेखी अहवाल व केलेल्या कारवाईची माहिती अर्जदारास देण्यात यावी.
या मागणी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages