ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल
ज्ञानेश कुमारांविरोधातील लढ्यात फूट पाडण्याचा डाव-अभिजीत दिपके
यानंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. संविधानाचे रक्षण करणे हाच आमच्या आंदोलनाचा उद्देश असल्याचं गांधी म्हणाले.
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या आहेत
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या आहेत असे गांधी म्हणाले. आमची टीम आता थांबणार नाही. मतचोरीचा मुद्दा राजकीय नाही तर सर्वसामान्य जनतेचा आहे असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपविरोधात आम्ही सगळ्यांची एकजूट असल्याचे गांधी म्हणाले.
मोदी हे आर्किटेक्ट आहेत, तर अमित शाह आणि ज्ञानेश कुमार इम्प्लिमेंटर
आम्ही इथे सगळे एकत्र आहोत, उभं आहोत एक म्हणून आहोत. लोकशाही संपवली जात असल्याचे गांधी म्हणाले. जंतर मंतरवर आता लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास दिले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी हे आर्किटेक्ट आहेत, तर अमित शाह आणि ज्ञानेश कुमार इम्प्लिमेंटर आहेत असे गांधी म्हणाले. तुम्ही लोकशाही संपवू शकत नाही. तुम्ही काल जे पाहिलं ते फक्त पक्षाचे नाही तर सर्वसामान्यच्या भावना होत्या. हे सगळं भारतीयांसाठी सुरु आहे, देशाच्या भविष्यासाठी करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही सगळे मिळून लढत राहणार
काल मी पत्रकार परिषद मध्ये बोललो आम्ही थांबणार नाही, आज नाही तर उद्या ही टीम एन्ड गोलपर्यंत जाणार आहे. सगळं आम्ही आता सांगणार नाही. तुम्हाला सरप्राईज केलं जाणार आहे. आम्ही सगळे मिळून लढत राहणार आहोत. आम्ही न्यायलाय सरन्यायधीश यांचा आदर करतो ते त्यांचा रोल प्ले करतील असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडीया आघाडीचे नवी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एक मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडीच्या मोर्चावर अप्रत्यक्ष भाष्य करत केंद्र सरकार आपल्याला (इंडिया आघाडी आणि सीजेपी) एकमेकांविरोधात उभं करत आहे, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. पण आपण आपण एकजुटीने उभं राहायला हवं असंही दिपके यांनी म्हटलं आहे.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
'जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी मिळाली, तेव्हा अनेकांनी लगेच असे तर्क मांडले की आम्हाला भाजपानेच मुद्दाम तिथं पाठवलं होतं. 'इंडिया'आघाडीने काल एक मोठं आंदोलन केलं, पण १० ऑक्टोबरला आमच्या बाबतीत जशी कठोर कारवाई झाली, तसं इंडिया आघाडीबाबत काही घडलं नाही. केंद्र सरकार नेमकं याच पद्धतीने आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करतंय. वेगवेगळ्या आंदोलनांशी वेगवेगळ्या प्रकारे वागून देऊन ते अशा लोकांमध्ये संशय आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे मुळात एकाच ध्येयासाठी लढत आहेत', असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.
'माझी सर्वांना एक विनंती आहे की, त्यांनी वापरलेल्या या युक्त्या आणि डावपेच ओळखा. आज ते एका आंदोलनाला परवानगी देऊ शकतात आणि दुसरं आंदोलन दडपू शकतात. उद्या ते या भूमिकांची अदलाबदलही करू शकतात. सत्तेत असलेल्यांना जाब विचारण्याऐवजी आपण एकमेकांवरच संशय घेत राहावं, हाच त्यामागचा उद्देश आहे', असंही अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
'कट-कारस्थानांच्या अशा चर्चांमुळे आपल्यात फूट पडू देऊ नका. जेव्हा आपण एकजुटीने उभं राहायला हवं, तेव्हा आपापसात भांडणात अडकू नका. हा लढा ज्ञानेश कुमार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध आहे, हे कधीही विसरू नका', असं अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला उद्देशून म्हटलं आहे.

No comments:
Post a Comment