माहिती अधिकार दिनानिमित्त दक्षिण सोलापूर पंचायत समितीत कार्यशाळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या अधिकाराबाबत कार्यशाळा तसेच प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व विशद केले. प्रशासनात पारदर्शकता आणणे, शासकीय कामकाज जनतेसाठी खुले करणे आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविणे हा माहितीच्या अधिकार कायद्याचा प्रमुख उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
माहिती अधिकार कायद्यानुसार अर्जदाराने मागितलेली माहिती निर्धारित मुदतीत, साधारणपणे ३० दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा महत्त्वाचा कायदेशीर अधिकार असून, नागरिकांना माहिती देताना प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे, असेही गोडसे यांनी नमूद केले.
कार्यालयातील कामकाजाचे स्वरूप, विविध नियम, कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
कार्यशाळेनंतर माहितीच्या अधिकारावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये मनीषा वास्ते, गिरीषचंद्र वाघमारे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, सुरेश राठोड, समीर शेख, मृणालिनी शिंदे, संदीप घोडके, शहानवाज शेख, बसवराज बिराजदार, रुपाली मोरे, स्नेहा जाधव, अंजली पाटील, आरती मैंदळकर, सुरेखा तोंडसे, मिलन बिराजदार, श्रीकांत माने, चंद्रकांत जगताप, अजीज सय्यद, महेश गायकवाड, मनोहर राठोड, दिपाली देंडे आणि प्रज्वल कुर्ले यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment