शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची- महापौर कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची- महापौर कोंड्याल

 शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची- महापौर कोंड्याल

श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत सत्कार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीमध्ये पत्रकारितेचे स्थान महत्त्वाचे असून पत्रकार समाजातील विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. शहराच्या विकासातही पत्रकारांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी महापालिका सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल. पत्रकारांच्या गृह प्रकल्पासाठी  सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
         सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सोमवारी महापौर कार्यालयात करण्यात आला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि नगरसेवक मनीष केत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चौदाव्यांदा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे, सरचिटणीस आफताब शेख , खजिनदार विजय गायकवाड, उपाध्यक्ष  अविनाश गायकवाड, नितीन पात्रे,
चिटणीस रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित, सहचिटणीस रोहित थळवे, कार्यकारिणी सदस्य रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, मुजम्मील शाहनूरकर, सागर इप्पलपल्ली, महेश कुलकर्णी. सल्लागार प्रशांत जोशी आदींसह पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
         यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांनी सोलापूर शहर विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.
पत्रकारांच्या गृहप्रकल्प सोयी सुविधायुक्त व्हावा यासाठी नेहमी सहकार्याची भूमिका राहील, असे आश्वासन देत नूतन  पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार किरण बनसोडे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages