ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तिदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शक्तिदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेची भव्य मिरवणूक रविवारी रेल्वे स्थानक परिसरातील गांधी पुतळ्याजवळील पोस्ट ऑफिस येथून मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते शक्तिदेवीची महापूजा व आरती करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’ या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. सुमारे एक हजार लेझीमधारकांचा शिस्तबद्ध ताफा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. पारंपरिक वेशभूषेतील युवकांनी अस्सल सोलापुरी ढोल-ताशा आणि संबळच्या निनादात लेझीमचे बहारदार डाव सादर केले. तालबद्ध संचलन, आकर्षक प्रात्यक्षिके आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मिरवणुकीत भक्ती आणि पारंपरिक कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही लेझीम खेळात सहभाग घेतला. मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलेला कंटेनर हे श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर कडे प्रस्थान होत असताना ज्या पद्धतीने सजावट करतात त्याचीच प्रतिकृती असलेले विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी सुंदररीत्या सजविण्यात आला होता. या सजविलेल्या वाहनाच्या मध्यभागी शक्तिदेवीची मूर्ती, श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील यल्लमादेवीची मूर्ती, शिवलिंगावरील शंकरांची मूर्ती तसेच भगवान विष्णू मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुकीच्या वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाचे आधारस्तंभ तथा संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (मामा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नागेश (अण्णा) गायकवाड, भाजपा नगरसेवक किसन (भाऊ) जाधव मार्गदर्शक ॲड. अनिल (दादा) जाधव, आणि उत्सव अध्यक्ष अंबादास पट्टप्पा जाधव (A24) यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक राजशेखर पाटील, स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजीखाने, ज्ञानेश्वर माऊली म्याकल, नगरसेविका अश्विनी चव्हाण, चैत्राली गायकवाड, श्रद्धा किरण पवार, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, अश्विनी हॉस्पिटलचे सर्जन डॉ.सुजित जागीरदार, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, सुधीर बहिरवडे, पर्यावरण प्रेमी महेश देवकर, किरण पवार, मंडळाचे सल्लागार शिवाजी मामा गायकवाड, अंबादास गायकवाड, राजू गवळी, मामा गायकवाड, उत्पादन शुल्कचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गैबू जाधव, गोपाळ बार्शीकर, मारुती अकलूजकर, मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन अक्षय जाधव, टकारी युवक अध्यक्ष विनोद जाधव, पवन गायकवाड, अँड संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. चेतन गायकवाड व कार्तिक जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत व सन्मान केले. आमदार देवेंद्र कोठे यांनी मंडळाला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत ईच्छा भगवंताची परिवाराच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. गेल्या तीस वर्षांपासून मंडळाशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असून, मंडळाचे कार्य जवळून पाहत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक खेळांच्या माध्यमातून युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, भारतीय संस्कृतीचे जतन करावे आणि सामाजिक ऐक्याची भावना वृद्धिंगत करावी, असा संदेश या भव्य मिरवणुकीतून देण्यात आला. या मिरवणुकी दरम्यान पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शकलेस चाकोते, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी देखील सहभाग घेतला होता. मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात आई राजा उदे उदे सदानंदीच्या उदो उदो गजरात रात्री शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत पूजनाने रामवाडी सेटलमेंट येथे करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment