दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा होणार

 दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा होणार

प्रा. शिवाजीराव सावंत यांची-सन्मान सोहळ्यात घोषणा





माढा (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीत गरजू कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने  काही वर्षांपासून खंडित झालेला सामुदायिक विवाह सोहळा यंदा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य शेतकरी गोरगरिब कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याची माहिती प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली. प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील सन्मान सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

प्रा.सावंत पुढे बोलताना म्हणाले, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला असून, शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील विवाह समारंभ पार पाडताना मोठा खर्च करणे अनेकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे गरजू कुटुंबांना मदत व्हावी आणि त्यांच्या आर्थिक बाबतीत काही प्रमाणात हातभार लागावा, या उद्देशाने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत यांनी सांगितले.समाजातील गरजू घटकांना मदत करणे आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने खंडित झालेला सामुदायिक विवाह सोहळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रा. सावंत यांनी स्पष्ट केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या  सन्मानार्थ  सत्कार करण्यात आले.


वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव-

दरम्यान, प्रा. शिवाजीराव सावंत यांचा वाढदिवस वाकाव येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात सामुदायिक विवाह सोहळ्याची घोषणा करण्यात आल्याने सामाजिक उपक्रमातून गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना मिळाली....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages