खंडणीखोरांचा म्होरक्या राणा सूर्यवंशी रुबी हॉलमधून फरार ? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 26, 2026

खंडणीखोरांचा म्होरक्या राणा सूर्यवंशी रुबी हॉलमधून फरार ?

 खंडणीखोरांचा म्होरक्या राणा सूर्यवंशी रुबी हॉलमधून फरार ?

चौकशीपूर्वीच गायब झाल्याच्या वृत्ताने खळबळ !







पुणे/ बारामती (कटूसत्य वृत्त) : बारामती विमानतळ परिसरात सूर्यवंशी राणा याच्यावरील कथित हल्ला

प्रकरणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. खंडणीखोर टोळीचा म्होरक्या असलेला राणा

सूर्यवंशी आता पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्याचे वृत्त समोर आले आहे. रुबी हॉलरुग्णालयातून चौकशीपूर्वीच तो फरार झाल्याचे वृत्त माध्यमातून चर्चेत येत असताना, त्याच्या

जवळच्या तीन व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील नेमके सत्य बाहेर काढल्याशिवाय पोलीस गप्प बसणार नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कथित हल्ला प्रकरणाला धक्कादायक वळण जवळच्या तीन मित्रांचाही शोध सुरू, सीसीटीव्ही फुटेजमधून नवे धागेदोरे राणा सुर्यवंशी व त्याच्या खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश पोलीस लवकरच करणार

हल्ला प्रकरणात संशयाची दिशा बदलली!

१८ ऑक्टोबर रोजी बारामती परिसरात राणा सूर्यवंशी याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. सुरुवातीच्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्याजवळ येत हल्ला केला.गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले; मात्र राणाला गोळी लागल्याचे निष्पन्न झाले नव्हते. धारदार शस्त्राच्या वारामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, संशयिताच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींमधील संपर्क यांची तपासणी सुरू झाली. आता याच तपासातून हल्ल्यामागील कथित कटाबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत..सुपारी राणा ने दिली..!

खात्रीलायक सूत्रांच्या वृत्तांनुसार, हल्ला घडवून आणण्यासाठी दोन लाख रुपयांची कथित सुपारी राणा सुर्यवंशी यानेच दिल्याचे पोलीस तपासात जवळपास निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राणा सूर्यवंशी याचा वाहनचालक व भिगवन परीसरातील राणाचा वसूलदार ज्ञानदेव शिंदे आणि पार्थ आव्हाळे  यांच्यासह अन्य संशयितांची नावे समोर आली आहेत. काही संशयितांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे..

पोलिसांच्या तपासानुसार, कथित सुपारीचे आर्थिक व्यवहार कोणी केले. हल्लेखोरांशी संपर्क कोणी साधला आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

वाय प्लस सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

राणा सूर्यवंशी याला वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी सुरक्षा कर्मचारी नेमके कुठे होते, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या व्यवस्थेचा प्रशासकीय आधार काय होता, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलीस महासंचालकांनी

राणा सूर्यवंशी याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेतला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ हल्ल्याचा तपास

नव्हे, तर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीही महत्त्वाची ठरत आहे.

शिक्षा संथात गोल कनीयां

दोन लाखांच्या कथित जवळच्या तीन मित्रांच्या हालचाली संशयाच्या भोवऱ्यात.

या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राणा सूर्यवंशी याच्या निकटवर्तीय असलेल्या तीन व्यक्तींच्या हालचाली पोलिस तपासाच्या कक्षेत आहेत. या व्यक्ती कथित हल्ल्यापूर्वी आणि त्यानंतर कुठे होत्या, कोणाला भेटल्या आणि त्यांचा संशयितांशी काही संबंध होता का, याची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वासनिय सुत्रांच्या वृत्तानुसार, डिफेंडर वाहनातून संशयित व्यक्तींना

भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तसेच, पोलिसांचा संशय वाढल्यानंतर संबंधित व्यक्तींचे फोन बंद असल्याचे आणि त्यांचा शोध सुरू आहे. या सर्व खंडणीखोर व्यक्तींची चौकशी झाल्यानंतरच कथित कटातील त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकते. त्यांचा एकमेकांशी झालेला संपर्क, कॉल रेकॉर्ड CDR. ओळख किंवा सीसीटीव्हीतील उपस्थितीच्या आधारे दोष निश्चित करून स्वतंत्र आणि ठोस पुरावे मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

रुबी हॉलमधून फरार झाल्याचे वृत्त;

राणा सूर्यवंशी रुबी हॉल रुग्णालयातून चौकशीपूर्वीच फरार झाल्याचे वृत्त आल्याने या प्रकरणात अनेक रुबी हॉल रुग्णालयाच्या प्रशासकीय आणि तपासविषयक प्रश्न निर्माण झाले आहेत. तो रुग्णालयातून नेमका कधी बाहेर पडला ? त्याला रुग्णालयातून जाण्याची वैद्यकीय परवानगी होती का ? पोलिसांना त्याच्या हालचालींची माहिती दिली होती का ? त्याला चौकशीसाठी अधिकृत नोटीस देण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची ठरतील.

आता सत्य बाहेर येणारच...!

राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ला, दोन लाखांच्या सुपारीचा संशय, निकटवतीर्यांच्या हालचाली आणि रुग्णालयातून फरार झाल्याने या सर्व बाबींची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, रुग्णालयातील नोंदी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांतूनच घटनाक्रम

स्पष्ट होऊ शकतो. पोलीसांच्या हाती पुराव्यांतूनच सत्य समोर आल्याने. राणा सूर्यवंशी रुग्णालयातून खरोखर फरार झाला आहे का, त्याच्या जवळच्या तीन व्यक्तींचा कथित कटात सहभाग आहे का आणि हल्ल्यामागील सूत्रधार कोण, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या अधिकृततपासातूनच मिळतील. हाय- प्रोफाइल प्रकरण असल्यामुळे तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि पुराव्यांवर आधारित होणे हीच जनतेची अपेक्षा आहे.

खंडणीखोर टोळीचा लवकरच पर्दाफाश.. ? राणा सूर्यवंशी आणि त्याच्याशी संबंधित खंडणीखोर टोळीबाबत पोलीस तपासातून लवकरच महत्त्वाचे धागेदोरे व खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू असल्याची चर्चा आहे. ज्या ज्या व्यक्तींना व संस्थांना या खंडणीखोर टोळीने त्रास दिला आहे त्या सर्वांनीपोलिसांकडे येऊन तक्रारी देणं गरजेचं असल्याचं काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages