कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माळुंब्रा येथे आस्था सामाजिक संस्था भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचा उपक्रम ; 15 तज्ज्ञ डॉक्टरांकडून हजारो वारकऱ्यांवर उपचार
(कटूसत्य वृत्त):-माळुंब्रा, ता. तुळजापूर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आस्था सामाजिक संस्था, लायन्स क्लब सोलापूर मेन, विश्वधर्म आणि ज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील माळुंब्रा येथे मोफत मेडिकल कॅम्प (औषधोपचार शिबिर) चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन दिनांक 24 व 25 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. सुरुवातीस समाजसेवक जयराज नागणसुरे, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धीप्रमुख सुहास छंचुरे, वेदांत तालिकोटी, अनिल कपाळे, गणेश ठेसे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या मेडिकल कॅम्पमध्ये सोलापूर वर्क फॉर कॉम्पॅशन आणि पुणे वर्क टीम च्या वतीने 15 डॉक्टरांच्या पथकाने यात्रेकरूंच्या दुखापती व आरोग्य समस्यांवर उपचार केले.
शिबिरात उपलब्ध मोफत औषधे व सेवा:
सर्दी-खोकला, मोचेसाठी स्प्रे, अंग-पाय दुखीवर ऑइंटमेंट व मसाज तेल, जखमेवरील क्रीम, पित्तावरच्या गोळ्या, ड्रेसिंग साहित्य, मोहरी तेल, सलाईन, पेन किलर, बँडेज पट्टी, कापूस इत्यादी औषधांची सोय करण्यात आली होती.
डॉक्टरांची टीम: मुजम्मिल शेख, रफिक शेख, आसिफ शेख, अनिस पठाण, शाहनवाज पठाण, तोसिफ डांगे, आतिफ मलकजी, साबिर पटेल, रेवन चडचणकर, मनोज लंगोटे, शशांक हंडगे हे डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष आनंद तालिकोटी म्हणाले, "आस्था सामाजिक संस्था गेल्या 8 वर्षांपासून हा मोफत मेडिकल कॅम्प आयोजित करत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, समाजाचं ऋण फेडण्यासाठी या उद्देशाने ही सेवा घडावी. तुम्ही जमिनीवर राहणाऱ्यांवर दया करा, परमेश्वर तुमच्यावर दया करेल."
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे, उदय छंचुरे, प्रथमेश गावडे, वेदांत कलशेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.

.jpeg)

No comments:
Post a Comment