‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारणार; पालकमंत्री गोरे आक्रमक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारणार; पालकमंत्री गोरे आक्रमक

 ‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारणार; पालकमंत्री गोरे आक्रमक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. विरोधकांच्या या भूमिकेला रस्त्यावर उतरून उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हेरिटेज येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा, पक्षाची भूमिका आणि केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. देशाच्या विकासाबाबत विरोधकांकडून चुकीचे चित्र उभे करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गोरे यांनी यावेळी केला.
विरोधकांच्या आरोपांना केवळ राजकीय वक्तव्यांतून उत्तर न देता भाजप कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन वस्तुस्थिती मांडावी. मोदी सरकारने केलेली विकासकामे, विविध योजनांचे लाभ आणि देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ या घोषणेच्या माध्यमातून विरोधकांच्या राजकारणाला प्रत्युत्तर देत व्यापक जनजागृती करण्याची भाजपची रणनीती आहे. आगामी काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय करून सरकारची विकासकामे घराघरांत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
या बैठकीला आमदार राजा राऊत, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंके, दिलीप माने, नरसिंग मेंगजी, राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गणेश चिवटे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहाजी पवार, बाळराजे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages