निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश ननवरे यांचे निधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील आणि सध्या सोलापुरातील मड्डी वस्ती, भवानी पेठ येथे वास्तव्यास असलेले निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश मारुती ननवरे (वय ७३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
ननवरे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सेवा बजावली होती. पोलीस उपनिरीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेत आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मड्डी वस्ती, भवानी पेठ येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, रुपाभवानी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
.png)
No comments:
Post a Comment