गोपाळपूर ग्रामपंचायतीचे स्वतः चे आपले वाचनालय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

गोपाळपूर ग्रामपंचायतीचे स्वतः चे आपले वाचनालय

 गोपाळपूर ग्रामपंचायतीचे स्वतः चे आपले वाचनालय

यशदाचे उपसंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे हस्ते उदघाटन



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- गावात स्पर्धा परिक्षे बरोबर इतर ग्रामस्थांना वाचनाची आवड निर्माण होणे साठी गोपाळपूर ग्रामपंचायने स्वतः चे आपले वाचनालय सुरू केले आहे.
आज गोपाळपूर येथे यशदा पुणे नवनियुक्त अधिकारी (CPTP-12) व ग्रामपंचायत गोपाळपूर यांच्यामार्फत ग्रामपंचायत मध्ये "आपलं वाचनालयाच " उदघाटन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविणेत येत आहे.
वाचनालयासाठी यशदा पुणे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुस्तकं भेट दिली.
 यावेळी यशदाचे उप महा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर अमोल जाधव, कुलकर्णी विषय तज्ञ यशदा कचरे समन्वयक यशदा तांबोळी एस आर प्रशासक गोपाळपूर सचिन जाधव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच सर्व प्रशिक्षनार्थी क्षितिज पाटील- डी वाय एस पी, नितीन आसबे - गटविकास अधिकारी, अमित नंदेश्वर -गटविकास अधिकारी, आशिष गायकवाड-वित्त व लेखाधिकारी,
सुमित कानडे -वित्त व लेखाधिकारी, शक्तीसिंह कार्वेकर- सहाय्यक राज्यकर, आयुक्त अनिरुद्ध चव्हाण-सहाय्यक राज्यकर आयुक्त तसेच सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका आशा ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यशदाचे दिली ५० पुस्तकांची भेट..!
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी ने ५० पुस्तके तर गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी देखील ५० पुस्तके भेट दिली. गावातील अंगणवाडी सेविका या देखील पुस्तके भेट देऊन  आपलं वाचनालय सिध्द करून दाखविले आहे.
प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी ५० पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीस भेट दिला. ग्रामविकास पंचायत अधिकारी ज्योती पाटील यांचे कडे हे संच सुपूर्द करणेत आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages