मोहोळ मतदारसंघातील ग्रामीण विकासासाठी भरीव निधी द्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

मोहोळ मतदारसंघातील ग्रामीण विकासासाठी भरीव निधी द्या

मोहोळ मतदारसंघातील ग्रामीण विकासासाठी भरीव निधी द्या




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांतर्गत भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली.


मोहोळ तालुक्यातील १०४, उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ आणि पंढरपूर तालुक्यातील १७, अशी एकूण १४५ गावे समाविष्ट आहेत. या गावांमध्ये रस्ते, गावांतर्गत रस्ते तसेच विविध मूलभूत सुविधांची अनेक कामे प्रलंबित आहेत. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून १४५ गावांतील आवश्यक विकासकामांना प्राधान्य देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, गावांतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावावीत आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली. मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार खरे यांनी राज्यमंत्री कदम यांच्यासमोर विविध मागण्या मांडल्या.


दरम्यान, राज्यमंत्री योगेश कदम यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाची परिस्थिती तसेच मांडण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या मागण्या जाणून घेतल्या. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे आ. खरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages