आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी




नाशिक  (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते व मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी अभिवादन केले.  
 याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, ॲड . संदीप कुलकर्णी, श्री. संदीप राठोड, श्रीमती योगीता पाटील, श्री. वाय.जी.पाटील, डॉ. प्रदीप आवळे, श्री. आबाजी शिंदे, श्री. नंदन वाघ, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. अनिल कुलकर्णी, श्री. नाना परभणे, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages