नवयुग तरुण मंडळातर्फे अभियंता दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 16, 2026

नवयुग तरुण मंडळातर्फे अभियंता दिन साजरा

 नवयुग तरुण मंडळातर्फे अभियंता दिन साजरा



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-  नवयुग बहुउद्देशिय संस्था संचलित नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळ वैष्णवनगर (इसबावी) यांच्यावतीने सर डॉ. मोक्षगुंडम्म विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली.
मंडळाचे संस्थापक मेजर प्रशांत म्हेत्रे, मार्गदर्शक शशिकांत म्हेत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवनगर येथील मारुती मंदिर सभामंडपात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब बळवंत सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न.पा. बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश केसकर साहेब , लायसन्सड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काळे साहेब हे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी श्री गणेश व मारुतीची आरती करण्यात आली. त्यानंतर सर डॉ. मोक्षगुंडम्म विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून मंडळाच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यानंतर अभियंता विकास साळुंखे, महेश शहा, सारंग कोळी, बाळ कुंभार, अमित गांधी, ज्ञानेश्वर कोल्हे, निळकंठ मुळे, प्रविण जगताप, गोपाळ धोत्रे, सचिन माळवदे, पृथ्वीराज पवार, विवेक काळे यांच्यासह उपस्थित अभियंत्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पांडुरंग यलमार, रत्नाकर पिसे, राजेंद्र पाटील, राजेंद्र कुलकर्णी, संतोष माळवदे, संतोष ताड, प्रकाश लोखंडे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन विलास जगधाने सर यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत म्हेत्रे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संकेत गायकवाड, उपाध्यक्ष करण पंगुडवाले, खजिनदार ओंकार गायकवाड, सचिव सौरभ बहिरगुंडे, गणेश जवारे, सुहास डुरे-पाटील, प्रतिक यलमार, शंतनु मिसाळ, प्रथमेश म्हेत्रे, प्रविण म्हेत्रे, यश गलांडे, करण गलांडे, प्रतिक दुसाने, वेदांत कावळे, पियुष म्हेत्रे, माऊली म्हेत्रे, प्रणित म्हेत्रे, नवयुग तरुण मंडळ व S.M. GROUP च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages