मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड; उपाध्यक्षपदी पोपट भोसले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड; उपाध्यक्षपदी पोपट भोसले

 मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी राम गायकवाड; उपाध्यक्षपदी पोपट भोसले





तुळजापूर (कटूसत्य वृत्त) : मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत विभागाच्या सचिवपदी शिवश्री राम विठ्ठल गायकवाड, तर उपाध्यक्षपदी शिवश्री पोपट भोसले यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या दक्षिण भारतातील विस्ताराच्या दृष्टीने या निवडीकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.


तुळजापूर येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राम गायकवाड यांना सचिवपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सचिव सुनील महाजन यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


राम गायकवाड यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून यापूर्वी विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान दिले आहे. समाजप्रबोधन, संघटनवाढ आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मराठा सेवा संघाच्या कार्याच्या जडणघडणीत राम गायकवाड आणि पोपट भोसले यांचे योगदान राहिले असल्याचेही उपलब्ध माहितीत नमूद करण्यात आले आहे.


दक्षिण भारत सचिवपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे दक्षिण भारतातील संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे, विविध सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आता राम गायकवाड यांच्यासमोर असणार आहे.


दरम्यान, पोपट भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने दक्षिण भारतातील संघटनात्मक कामकाजाला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


या निवडीमुळे दक्षिण भारतातील मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

चौकट- शिवछत्रपतींच दक्षिण भारतावर विशेष प्रेम होत. बालपण आणि शिक्षण दक्षिण भारतातच झाल होत, स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंनी स्वराज्याची पेरणी  बेंगरूळ येथेच केली होती. आपल्या तिन्ही पुत्रांनी संपुर्ण दक्षिण भारतावर राज्य कराव ही महत्वकांशा शहाजीराजेंची होती. येथील रयतेने देखील सहकार्य केले होते. त्यामुळेच दक्षिण भारतात मराठा सेवा संघाच काम करायला विशेष महत्त्व आहे. - राम गायकवाड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages