कन्हेरगाव येथे गुणवंतांचा सत्कार
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कन्हेरगाव येथील आदित्य पोपट मोरे यांची कोपरगाव येथे कु सानिका नागनाथ खोचरे बेळगाव येथे तर कुमारी सायली साळुंखे (अर्जुन नगर) अलिबाग येथे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एमबीबीएस प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच समर्थ नागनाथ खोचरे बीएससी ऍग्री प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन अतुल डोके परिवाराने केले होते. यावेळी किसनराव डोके प्रगतशील बागायतदार संतोष पवार,विकास सेवा सोसायटीचे सचिव देविदास डोके, डॉ. नितीन डोके युवा उद्योजक दादासाहेब खोचरे,पोपट मोरे सर, श्रीमती उषा डोके, श्रीमती रोकडे,सौ.वनिता पवार,सौ.संगीता मोरे,सौ. मनीषा खोचरे, सौ.वर्षा डोके,सौ.जयश्री डोके,कु. ज्ञानदा डोके, तेजस्विनी डोके, माऊली खोचरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment