मोहोळ येथे ज्ञान माऊली या संगीतमय सोहळ्याचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

मोहोळ येथे ज्ञान माऊली या संगीतमय सोहळ्याचे आयोजन

मोहोळ येथे ज्ञान माऊली या संगीतमय सोहळ्याचे आयोजन



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री  आशीष शेलार यांच्या पुढाकारातून राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. ज्ञान माऊली या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकसेवा कॉन्फरन्स हॉल मोहोळ येथे करण्यात आले आहे.
          ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित ध्वनी चित्रफीत ,शास्त्रीय नृत्य, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चांगदेव भेट,ज्ञानेश्वरी लेखन, ज्ञानेश्वर समाधी सोहळा या नाटिका सादरीकरणाबरोबरच हरिपाठ, वारी नृत्य ,अभंग गायन होणार आहे,सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे
            या उपक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, साहित्य, जीवनचरित्र आणि त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तरुण पिढीपर्यंत तसेच येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. स्वरताल संगीत विद्यालय मोहोळ व श्री संत नामदेव जनाबाई वारकरी शिक्षण संस्था मोहोळ या संस्थेतील विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी असणार आहेत. तालुक्यातील व जिल्ह्यातील स्थानिक कलाकार यात सहभाग घेणार आहेत. प्रवचनकार महादेव माने गुरुजी हे ज्ञानेश्वर समाधी सोहळा व पसायदान यावर प्रवचन देणार आहेत.
           या कार्यक्रमात विद्यार्थी कलाकारांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचे भावपूर्ण गायन सादर करण्यात येणार असून, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग नाट्यरूपाने साकारले जाणार आहेत. भक्ती, संगीत, साहित्य, अध्यात्म आणि विचारांचा सुंदर संगम असलेला हा अनोखा संगीतमय सोहळा विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
            संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आणि त्यांची ज्ञानपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या विशेष कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages