अभियंता दिनानिमित्त सोलापूर विकास मंचाचा विकासाचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

अभियंता दिनानिमित्त सोलापूर विकास मंचाचा विकासाचा संकल्प

 

अभियंता दिनानिमित्त सोलापूर विकास मंचाचा विकासाचा संकल्प




सोलापूर (कटूसत्य वृत्त) : अभियंता दिनानिमित्त सोलापूर विकास मंचाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील अभियंते, तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मंचाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याबरोबरच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

सोलापूरच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहती, आयटी क्षेत्र, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि नियोजनबद्ध शहरी विकास या विषयांवर तज्ज्ञांच्या सहभागातून ठोस काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

केवळ विकासाच्या समस्यांकडे लक्ष वेधून थांबण्याऐवजी संबंधित विषयांचा सखोल अभ्यास करून व्यवहार्य उपाययोजना सुचविणे आणि त्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शासन व प्रशासनासोबत समन्वयाने काम करणे, अशी भूमिका सोलापूर विकास मंचाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

अभियंता दिनाच्या निमित्ताने ‘तज्ज्ञांचे ज्ञान, नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाशी समन्वय यांच्या माध्यमातून सक्षम, आधुनिक आणि विकसित सोलापूर घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करूया’, असा संदेश देण्यात आला.

यावेळी सोलापूर विकास मंचाचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले, गणेश पेनगोंडा, तेजस गुर्जर, भारत पाटील, शुभांगी पाटील, वासुदेव आडकी, बाळासाहेब मोरे, विशाल जोग, अभय दुस्सल, अमोगसिद्ध कोरे, निखिल कंदिकटला, वसंत कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांवर तांत्रिक दृष्टिकोनातून सातत्याने अभ्यास, संवाद आणि पाठपुरावा करण्याची भूमिका मंचाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages