मा नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

मा नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त

 मा नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी आर्चन पूजा 




सलग 25 वर्षे राज्यसरकार ते केंद्रसरकारचे सक्षम व समर्थपणे नेतृत्व करणारे समर्थ भारत, सशक्त भारत, आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी कटीबद्ध  पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद मिळावेत यासाठी जिल्ह्याचे नेते मा प्रशांत मालक परिचारक
भा ज पा जिल्हाअध्यक्ष श्री शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुलसी आर्चन पूजा संपन्न झाली 
सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे तुलसी आर्चन पूजेने करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष मा. शशिकांत नाना चव्हाण, माजी आमदार मा. श्री. प्रशांत मालक परिचारक, भाजपा पप्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. बापू सुरवसे, भाजपा गटनेते श्री. भागवत बडवे, नगरसेवक श्री. सौरभ थिटे, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. सुदर्शन यादव, माजी नगराध्यक्ष श्री. लक्ष्मण शिरसट, अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सतीश मुळे, मनोज सुरवसे, युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. अनुप देवधर, उपाध्यक्ष श्री. अजित लेंडवे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याचे नियोजन नगरसेवक सौरभ थिटे पाटील यांनी केले 
मा नरेंद्रजी मोदी  याच्या यशस्वी 25 वर्ष सेवाकार्याबद्दल 
महाराष्ट्र सरकार व भा ज पा महाराष्ट्र प्रदेश यांनी 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर हा महिना सेवा संकल्प महिना म्हणून राबविण्याचे ठरविले आहे. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून देशपातळीपासून बूथ पर्यंत सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हे  अभियान राबवण्याचे ठरविले आहे.
या सेवा संकल्प अभियानातं युवक, महिला, शेतकरी उद्योजक विद्यार्थी यांचेसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याचे मा प्रशांत मालक परिचारक यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदा पासून पंतप्रधानांना पदापर्यंत केलेला राष्ट्र प्रथम या भावनेने केलेला प्रवास थोडक्यात सांगितला. जगात भारताची उंचावलेली प्रतिमा, गेल्या बारा वर्षातील विविध योजना, त्यांचा नागरिकांना झालेला लाभ याची माहिती देत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे ळ,अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना केली. 

उपस्थित मान्यवरांनी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद मा नरेंद्रजी मोदी यांना मिळावेत यासाठी तुळसी अर्चन केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages