सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत रोबोटिक सांधेरोपण व ऑर्थोपेडिक तपासणी शिबीर - डॉ. अनिरुद्ध पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत रोबोटिक सांधेरोपण व ऑर्थोपेडिक तपासणी शिबीर - डॉ. अनिरुद्ध पाटील

 सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत रोबोटिक सांधेरोपण व ऑर्थोपेडिक तपासणी शिबीर - डॉ. अनिरुद्ध पाटील




सोलापूर(कटूसत्य वृत्त):-   सोलापुरात हॉस्पिटल क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांकरिता बुधवारी मोफत सांधेरोपण आणि ऑर्थोपेडिक (अस्थिरोग) आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असल्याचे डॉक्टर अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले.

हे शिबिर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सकाळी दहा ते एक या दरम्यान संपन्न होणार असून याकरिता नाव नोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात रोबोटिक सांधेरोपण  करण्यात येणार असून सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिरुद्ध पाटील रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबीराची प्रमुख वैशिष्ट्ये सांगताना डॉ पाटील म्हणाले की 
सांधेदुखी सल्ला  तीव्र Knee Arthritis, Hip Arthritis, Shoulder Arthritis आणि 
रोबोटिक सांधेरोपण माहिती: अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेबाबत महत्त्वाचा सल्ला दिला जाणार आहे.

तसेच स्पोर्ट्स इंज्युरी म्हणजे खेळाडूंना होणाऱ्या स्नायू व सांध्यांच्या दुखापतींवर (Sports Injuries) विशेष मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात येणार आहे. दुसरे वैद्यकीय मत (Second Opinion): सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेल्या रुग्णांसाठी विनामूल्य मार्गदर्शन असणार आहे. 

सोलापूर शहर व परिसरातील सांधेदुखी व हाडांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी  या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील परिवाराकडून करण्यात आले आहे.

चौकट - डॉ. अनिरुद्ध पाटील हे अस्थिरोग आणि सांधेरोपण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी MBBS, MS (ORTH) सह FIJR (बंगळुरू), FISM (दिल्ली), FISS (मुंबई) या उच्च पदविका आणि इंग्लंड येथून 'रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट फेलोशिप' प्राप्त केली आहे. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे*

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages