विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी : २ विद्यार्थ्यांची विभागीय तर ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
कोंडी, जि. सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण २ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी तर ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्तरावर निवड (२ विद्यार्थी) -
१) कु. राजवीर विठ्ठल भोसले - वूशू व बॉक्सिंग
२) कु. आदर्श ज्योतिबा गुंड - लॉन टेनिस
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड (४ विद्यार्थी) -
१) कु. यश मारुती गुंड - बुद्धिबळ
२) कु. कार्तिकी दत्तात्रय भोसले - बुद्धिबळ
३) कु. राजवीर विठ्ठल भोसले - तायक्वांडो
४) कु. भूमिका नितीन गोमटे
या सर्व खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शिवश्री गणेश निळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी खेळाडूंना आदर्श निर्माण करण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते याचे थोडक्यात मार्गदर्शन केले यावेळी ते मनाले आज ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शहरातील सुविधा नसतानाही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आमची मुले विभागीय व जिल्हास्तरावर निवडली जात आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे._
_आमच्या संस्थेचा स्थापनेपासून एकच उद्देश आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही मोठे व्यासपीठ मिळावे. त्यासाठी आम्ही महाविद्यालयात सर्व क्रीडा सुविधा, अनुभवी क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. आजच्या या यशाने आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे._
_या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय स्तरावरच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरही आपल्या महाविद्यालयाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मी देतो. संस्थेच्या वतीने त्यांना लागणारी सर्व मदत आम्ही करू."_
या यशाबद्दल प्राचार्या सौ. सुषमा निळ, प्रा. प्रतीक्षा खुणे, प्रा. अर्चना औरादे व क्रीडा शिक्षक श्री. दिलीप भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment