रांगोळीतून‎ मोदींच्या कार्याला सलाम; ईच्छा भगवंताची‎ परिवाराचा अनोखा‎ संदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

रांगोळीतून‎ मोदींच्या कार्याला सलाम; ईच्छा भगवंताची‎ परिवाराचा अनोखा‎ संदेश

 रांगोळीतून‎ मोदींच्या कार्याला सलाम; ईच्छा भगवंताची‎ परिवाराचा अनोखा‎ संदेश






सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-   नवभारताच्या निर्माणासाठी अखंड‎ कार्यरत असलेले‎ आणि‎ ‘राष्ट्र‎ प्रथम’‎ हा विचार‎ सर्वोच्च‎ मानून‎ देशाच्या विकासासाठी योगदान देणारे‎ पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी‎ यांच्या‎ ७६व्या वाढदिवसानिमित्त ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या वतीने‎ अनोख्या पद्धतीने‎ शुभेच्छा देण्यात‎ आल्या. सोलापूर‎ महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील‎ श्री‎ गणेश मंदिरासमोर नरेंद्र‎ मोदी‎ यांचे‎ आकर्षक‎ रांगोळीतील छायाचित्र‎ साकारण्यात आले. या‎ रांगोळीच्या‎ माध्यमातून‎ ‘तीन‎ तलाक’विरोधी‎ कायदा, सामाजिक न्याय‎ आणि मुस्लिम महिलांच्या‎ सन्मानाचा संदेश‎ अधोरेखित‎ करण्याचा प्रयत्न‎ करण्यात‎ आला.‎ २०१९‎ मध्ये ‘तीन तलाक’विरोधी कायदा‎ अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम‎ महिलांच्या विवाहविषयक अधिकारांच्या संरक्षणाच्या दिशेने‎ महत्त्वपूर्ण‎ पाऊल‎ पडले. याच‎ सामाजिक‎ संदेशाला‎ रांगोळीच्या‎ माध्यमातून अधोरेखित‎ करत‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराने‎ मोदींच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा‎ उपक्रम‎ राबविला. प्रारंभी श्री‎ गणरायांच्या‎ चरणी विधिवत‎ पूजा करून दीपप्रज्वलन व‎ महाआरती करण्यात‎ आली.‎ यावेळी‎ उपस्थितांनी‎ पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी‎ यांना‎ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी‎ भावना‎ व्यक्त‎ करताना‎ सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एका पदावर असलेले नेतृत्व‎ नसून देशाच्या विकासाची आणि‎ राष्ट्रहिताची‎ नवी दिशा दाखविणारे नेतृत्व‎ आहे.‎ ‘सबका साथ, सबका‎ विकास,‎ सबका विश्वास’‎ या भावनेतून समाजातील‎ प्रत्येक घटकाला न्याय, सन्मान आणि‎ समान संधी‎ मिळावी,‎ यासाठी‎ विविध‎ निर्णय‎ घेण्यात आले.‎ मुस्लिम महिलांच्या‎ सन्मानासाठी‎ आणि‎ त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला ‘तीन‎ तलाक’विरोधी कायदा‎ हा‎ सामाजिक न्यायाच्या दृष्टीने‎ महत्त्वपूर्ण‎ संदेश देणारा‎ निर्णय असल्याचे‎ त्यांनी‎ नमूद‎ केले.
ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या वतीने‎ रांगोळीच्या माध्यमातून मोदीजींचे छायाचित्र साकारून त्यांना शुभेच्छा देण्यामागे‎ केवळ‎ वाढदिवस साजरा‎ करण्याचा उद्देश‎ नाही,‎ तर‎ त्यांच्या‎ राष्ट्रकार्याला आणि सामाजिक‎ परिवर्तनाच्या विचारांना‎ सलाम‎ करण्याची भावना आहे. श्री गणरायांच्या चरणी मोदीजींना‎ उत्तम आरोग्य,‎ दीर्घायुष्य लाभावे आणि‎ भारताला‎ अधिक‎ सामर्थ्यवान,‎ विकसित‎ व‎ आत्मनिर्भर‎ बनविण्याच्या‎ त्यांच्या‎ कार्याला यश‎ मिळावे,‎ हीच प्रार्थना, असे जाधव यांनी‎ सांगितले.याप्रसंगी‎ स्थायी समिती सभापती सौ.रंजिता चाकोते,नगरसेवक‎ विनोद‎ भोसले,पश्चिम‎ मंडल‎ अध्यक्ष‎ नागेश‎ खरात,नगरसेविका सौ.अश्विनी चव्हाण, सौ.चैत्रालीताई‎ शिवराज गायकवाड,स्वीकृत‎ नगरसेवक‎ अक्षय अंजीखाने,ज्ञानेश्वर माऊली‎ म्याकल,नगरसेवक‎ दायमा,‎ नगरसेविका वृषाली चालुक्य, नगरसेविका सौ.कल्पना‎ संतोष‎ कदम सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड,युवा नेते‎ चेतन‎ नागेश अण्णा‎ गायकवाड, कार्तिक‎ किसन‎ जाधव,माणिक‎ कांबळे,‎ वसंत‎ कांबळे, फिरोज पठाण,महादेव राठोड,‎ सुनील‎ कांबळे व‎ परिवार तसेच महापालिकेतील विविध‎ संघटनांचे कर्मचारी‎ यांच्यासह ईच्छा भगवंताची‎ मित्र‎ परिवाराचे पदाधिकारी‎ व‎ सदस्य उपस्थित‎ होते. मागील‎ वर्षीच्या कार्यकाळातील सेवा‎ संकल्प अभियानांतर्गत‎ प्रदेशाध्यक्ष‎ रवींद्र‎ चव्हाण यांनी‎ दिलेल्या‎ सूचनेनुसार‎ हा‎ उपक्रम राबविण्यात आला.‎ तसेच पालकमंत्री‎ जयकुमार गोरे,‎ आमदार सचिन‎ कल्याणशेट्टी,‎ आमदार देवेंद्र कोठे,शहराध्यक्ष‎ सौ.रोहिणीताई तडवळकर‎ तसेच‎ भारतीय‎ जनता‎ पक्षाच्या‎ सूचनेनुसार प्रथमच‎ महापालिकेत हा कार्यक्रम आयोजित‎ करण्यात‎ आला.‎ राज्याचे‎ कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण‎ महाराष्ट्रात‎ पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त‎ विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात‎ आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages