न्यासाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड- माधुरीताई मिसाळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

न्यासाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड- माधुरीताई मिसाळ

 न्यासाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड- माधुरीताई मिसाळ



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड दिल्याचे मनोगत राज्याचे नगरविकास राज्यमंत्री ना.माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती,कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड,मोहन डांगरे  यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका आदीजण उपस्थित होते.

याप्रसंगी पुरोहित संजय कुलकर्णी, सिद्धाराम टाके, प्रदीप पाटील, बालाजी पाटील, प्रवीण देशमुख, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, आतिश पवार, एस.के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, नवनीत पाटील, राजू पवार, प्रसाद हुल्ले, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages