मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची आ. अभिजित पाटील यांनी केली विचारपूस
माढा (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे आंदोलनाला बसलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी दि. १ सप्टेंबर रोजी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा हा चौथा दिवस असून, आंदोलनामुळे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असल्याचे यावेळी दिसून आले. त्यांच्याशी संवाद साधताना जाणवणारा शारीरिक त्रास पाहून मन अस्वस्थ झाले, अशी भावना आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.
“मायबाप सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर सकारात्मक तोडगा काढावा. लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी खेळू नये. मराठा आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात आपण ठामपणे सोबत आहोत,” अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेत आंदोलनावर लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment