अकलूजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

अकलूजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

 अकलूजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न





अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. मृदुला महेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे शिबिर मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील बहुउद्देशीय सभागृह, जुना बाजारतळ, अकलूज येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.

अकलूज नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा सौ. रेश्माताई लालासाहेब अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी-हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेवक व नगरसेविका यांच्या पुढाकारातून हे आरोग्यदायी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांमध्ये लेन्स बसविणे तसेच डोळ्यांतील आजारांसंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर तपासून आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची सुविधाही देण्यात आली. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर महंमदवाडी येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी आरोग्य वैद्यकीय सभापती तथा नगरसेवक क्रांतीसिंह किशोरसिंह माने-पाटील आणि नगरसेविका कु. मृदुला महेश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार नेत्र तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नगरपरिषद, आयोजक आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
 
या कार्यक्रमास अकलूज नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा सौ. रेश्माताई अडगळे तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच किशोरसिंह  माने पाटील, नगरसेविका सौ. मंदाकिनी पाडोळे,कु. उज्वलाताई विटकर, कु. मृदुलाताई सुर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते  लालासाहेब आडगळे तसेच प्रभाग क्रमांक सातचे सर्व कार्यकर्ते,व शिबिरात तपासणीसाठी आलेले नागरिक व महिला नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages