टेंभुर्णी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ चोरीच्या मोटारसायकली जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

टेंभुर्णी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ चोरीच्या मोटारसायकली जप्त

 टेंभुर्णी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ चोरीच्या मोटारसायकली जप्त

१३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; दोन अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद


टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-   मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. टेंभुर्णी शहरातील करमाळा ब्रीज परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या चौकशीत तब्बल २५ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकलींची एकूण किंमत १३ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत गणेश शिवा काळे (वय २९, रा. मोरेवस्ती, वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि प्रज्वल प्रतापराव मुंडफणे-पाटील (वय २४, रा. मुळगाव महाळुंग, ता. माळशिरस; सध्या रा. पिटकेश्वर रोड, निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली.
मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला.
२७ ऑगस्ट रोजी टेंभुर्णी शहरात पेट्रोलिंग सुरू असताना करमाळा ब्रीजजवळ दोन व्यक्ती चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना बिगर नंबरच्या शाईन मोटारसायकलीसह ताब्यात घेतले.
मोटारसायकलबाबत सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सदर मोटारसायकल कन्हेरगाव रोड, टेंभुर्णी येथील एका घरासमोरून रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर केलेल्या तपासात आरोपींनी टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, अकलूज, सातारा परिसरातून मागील सहा-सात महिन्यांत युनिकॉर्न, स्प्लेंडर, शाईन आणि एचएफ डिलक्स यांसह विविध कंपन्यांच्या २५ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या सर्व मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत १३ लाख ४५ हजार रुपये आहे.
आरोपींनी आणखी कोणत्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्या आहेत, तसेच या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर यांच्या पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा आणि टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर, स.पो.फो विलास नलवडे, पोलिस हवालदार संदिप गिरमकर, सुनिल मोरे, शिवाजी जाधव, पोलिस नाईक राकेश लोहार, पोलिस कॉन्स्टेबल मोहन तळेकर, ज्योतीराम घुमरे तसेच चालक हनुमंत देवकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला
ही झाली मोठी कारवाई केली तरी पण गेल्या दोन दिवसात टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोरून एका पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव यांची मोटरसायकल चोरीला गेली आहे त्यामुळे टेंभुर्णी शहरात कायदा व सुव्यवस्था डगमगल्या चे दिसून येत आहे टेंभुर्णी शहरात सध्या अवैध धंदे मटका , जुगार , दारू , टेंभुर्णी पोलीस स्टेशन किरकोळ कारवाई वगळता सध्या रात्रंदिवस वाळूचे हायवा टिपर रात्रीच्या वेळेस महसूल खात्याला व पोलीस खात्याला सहकार्य करून वाळू सप्लाय करत असते दिसून येत आहे याकडे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे लक्ष देणारच का कारवाई करणार याकडे लक्ष वेधले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages