पिंपरीसह पाच गावांच्या शेतीच्या पाणीप्रश्नावर मोहिते-पाटील यांचा पुढाकार, - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 14, 2026

पिंपरीसह पाच गावांच्या शेतीच्या पाणीप्रश्नावर मोहिते-पाटील यांचा पुढाकार,

 पिंपरीसह पाच गावांच्या शेतीच्या पाणीप्रश्नावर मोहिते-पाटील यांचा पुढाकार,


पाणीटंचाईच्या समस्येवर ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी साधला थेट संवाद

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील पिंपरी, मोरोची, कारुंडे, लोणंद व फडतरी परिसरातील शेतीच्या पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी ग्रामस्थांनी मोहिते-पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पाणी उपलब्धतेसंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
पिंपरी, मोरोची, कारुंडे, लोणंद व फडतरी या गावांतील शेतीच्या पाणीप्रश्नावर ठोस मार्ग काढण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages