कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना मानद कर्नल पदवी प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना मानद कर्नल पदवी प्रदान

 कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना मानद कर्नल पदवी प्रदान

ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात सन्मान


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   उच्च शिक्षणातील उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण आणि नॅशनल कॅडेट कोरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती तसेच शिस्त रुजवण्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना भारतीय सैन्यदल आणि एनसीसी महासंचालनालयाकडून  कर्नल ही अत्यंत प्रतिष्ठेची पदवी जाहिर झाली होती सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी विद्यापीठाच्या नवीन इमारतीमधील अहिल्याभवन या भव्य सभागृहात हा दिमाखदार पदवीदान व सन्मान सोहळा पार पडला. यावेळी एनसीसी पुणेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला यांच्या हस्ते कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना  कर्नल पदाची रँक, कॅप आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
  यावेळी बोलताना कमांडर ब्रिगेडियर एस.पी.एस रौतेला म्हणाले, शिक्षण क्षेत्रात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर नेतृत्वाखाली सोलापूर विद्यापीठाने केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला आहे. एनसीसीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, साहस आणि नेतृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी त्यांनी विद्यापीठ स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या याच दूरदृष्टीची आणि युवा पिढीला घडविण्याच्या तळमळीची दखल घेत त्यांना कर्नल या मानाच्या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. असेही रौतेला यांनी यावेळी नमुद केले. यावेळी रौतेला म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू जेव्हा मानद कर्नल म्हणून जबाबदारी स्वीकारतात, तेव्हा ते विद्यापीठातील सर्व एनसीसी युनिटचे प्रमुख मार्गदर्शक बनतात, ज्यामुळे विद्यार्थी व सैन्यदल यांच्यातील दुवा अधिक भक्कम होतो. ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला पुढे म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू हे केवळ एक प्रशासकीय प्रमुख नसून ते हजारो विद्यार्थ्यांसाठी एक दिशादर्शक असतात. प्रा. डॉ. महानवर यांनी एनसीसीला विद्यापीठात जे प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना सैन्यदलात आणि देशसेवेत जाण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या याच राष्ट्रनिर्माणाच्या आणि युवकांना शिस्तबद्ध करण्याच्या कार्याची पावती आहे.
यावेळी कर्नल पदवीच्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, भारतीय सैन्यदल आणि एनसीसीकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि अभिमानाचा क्षण आहे. हा बहुमान केवळ माझा वैयक्तिक नसून तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचार्‍याचा आहे. भविष्यात विद्यापीठातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभागी होऊन देशसेवेसाठी पुढे यावे, यासाठी आमचे प्रयत्न अधिक गतिमान होतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक विकासाबरोबरच नेतृत्व, व्यक्तीमत्व, सामाजिक जबाबदारी, जबाबदार नागरिक आणि संशोधक निर्माण करण्यासाठी मी मार्गदशन करणार असल्याचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी नमुद केले.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त अधिकारी डॉ. खराडे, परिक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे, प्रसिध्दि समिती समन्वयक डॉ. मलिक रोकडे यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अधिसभा सदस्य, अधिष्ठाता आणि  एनसीसीचे कमांडर, विविध संकुलांचे संचालक, प्राध्यापक वर्ग, संविधानीक, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने एनसीसीचे छात्र पूर्ण गणवेशात उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages