क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न

 क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  निघालेल्या   मिरवणुकीत सहभागी मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न




        (कटूसत्य वृत्त):-    क्रांतिवीर लहुजी  शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील 25 वर्षांपासून  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणूकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांचे स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यावर्षी   रविवार दि. 9/8/2026 रोजी  निघालेल्या  भव्य मिरवणुकांमध्ये सोलापूर शहरातील विविध 55 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळे  सहभागी झाली होती. या सर्व मंडळांचा स्वागत सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर  चौक येथे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने   ठेवण्यात आला होता .क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभ  कार्यक्रमास  सोलापूर शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोठे माजी पक्षनेते देवेंद्र भंडारे, लहुजी शक्ती सेनेचे  संस्थापक विष्णू कसबे, मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे,माजी नगरसेवक गुरुशांत धुतुरगावकर, माजी नगरसेवक दीपक राजगे अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे, युवा नेते सुधाकर पाटोळे, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड,शहर अध्यक्ष विजय अडसुळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे,सोनू देवकुळे,लेखक किशोर जाधव सर, टी. एस. क्षीरसागर सर,प्रा.परमेश्वर हटकर , श्रीकांत बोराडे ,बापूजी गायकवाड, रोहन लोंढे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   या कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्हा व महाराष्ट्रातील प्रमुख नेतेमंडळींचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांना  सन्मानचिन्ह फेटा,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages