रेड ॲपल फर्निचर आता सोलापूरात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- फर्निचर क्षेत्रात अत्यंत नावाजलेले महाराष्ट्रातील एकमेव ब्रँड म्हणजे रेड एप्पल फर्निचर होय. या देशांतर्गत ब्रँडच्या फर्निचर च्या फॅक्टरी आउटलेट चा शुभारंभ सोलापूरचे खासदार आदरणीय प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते फीत कापून व पारंपरिक पद्धतीने पूजा करून करण्यात आले असल्याचे मुख्य व्यवस्थापक अब्दुल रऊफ बेंनिशेरूर यांनी सांगितले.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील टीडीएफ ऑफीस शेजारी असलेल्या रेड एप्पल फर्निचरच्या कंपनी आउटलेट चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर, एमआयएमचे लतीफ शाब्दि, मुश्ताक बेन्नीशेरूर आदी उपस्थित होते.
रेड एप्पल फर्निचर संदर्भात सांगताना अब्दुल रऊफ म्हणाले की रेड ॲपल फर्निचर चे एकूण राज्यभरात 18 शोरूम्स 250 डीलर्स आणि ग्राहकांचा पंचवीस वर्षाचा प्रचंड विश्वास त्यांच्यासोबत आहे शिवाय पाच लाख आनंदी ग्राहक जोडले गेलेले आहेत. या देशांतर्गत रेड ॲपल फर्निचर शोरुम मध्ये जवळजवळ 100 बेडरूम सेट आणि डायनिंग सेट तसेच शंभर प्लस ऑफिस फर्निचर डिझाइन्स उपलब्ध आहेत.
ज्या ग्राहकांना सोफा ऑर्डर देऊन बनवायचा आहे त्यांच्यासाठी 300 प्रकारचे सोफा नमुने उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापुरातील रेड एप्पल फर्निचर या फॅक्टरी आउटलेटच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी जोरदार ऑफर दिली असल्याचे सांगितले यामध्ये 60% पर्यंत डिस्काउंट देणार असून ही ऑफर 15 ऑगस्ट चे ते 30 ऑगस्ट पर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले या ऑफरचा सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक विजय दरगड, मुस्ताक बिन्नीशिरूर, अमोल मुंदडा, राहुल करवा, राजेंद्र करवा आदींनी आलेल्या पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अब्दुल रऊफ बेंनिशेरूर यांनी केले. तर आभार अतिफ बेंनिशेरूर आणि अमोल मुंदडा यांनी मानले. कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातील व्यापारी मित्रपरिवार व पाहुणेमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment