ईच्छा भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे यांचा सोलापूरी पद्धतीने सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

ईच्छा भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे यांचा सोलापूरी पद्धतीने सन्मान

 ईच्छा भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे यांचा सोलापूरी पद्धतीने सन्मान




सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-‎ विधान परिषदेवर नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे (अजित‎ पवार गट)‎ आमदार‎ अनिकेत‎ सुनील तटकरे‎ यांचा ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराच्या वतीने सोलापुरी पद्धतीने‎ सन्मान‎ करण्यात आला.‎ सोलापूर‎ महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक‎ २२‎ चे भाजप‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांनी‎ रायगड‎ येथील‎ गीता‎ बाग, सुतारवाडी येथील‎ तटकरे‎ यांच्या निवासस्थानी जाऊन हा सत्कार‎ केला.‎ यावेळी‎ किसन जाधव यांनी अनिकेत‎ तटकरे‎ यांना‎ ‘अस्सल‎ सोलापुरी आमदार’‎ असा‎ उल्लेख‎ असलेला फेटा बांधून‎ भला मोठा पुष्पहार‎ घातला. तसेच‎ अस्सल‎ प्रसिद्ध सोलापुरी चादर‎ भेट‎ देण्यात‎ आली.‎ विशेष‎ आकर्षण ठरलेल्या‎ या सोलापुरी‎ चादरीवर‎ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ हे विधान परिषद आमदार‎ अनिकेतभाई तटकरे यांना पेढा भरवत असतानाचा,‎ तसेच‎ खासदार सुनील‎ तटकरे‎ आणि‎ महिला‎ व‎ बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा एकत्रित फोटो प्रतिमा स्वरूपात‎ विणण्यात आला‎ होता. ही‎ आगळीवेगळी प्रतिमा‎ पाहून आमदार अनिकेतभाई तटकरे भारावून‎ गेले. सोलापुरी‎ चादरीला‎ जगभरात वेगळी‎ ओळख आहे.‎ अशा जगप्रसिद्ध सोलापुरी‎ चादरीवर आपल्या‎ कुटुंबाचा आणि‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्यासोबतचा हा‎ विशेष क्षण प्रतिमेच्या‎ माध्यमातून‎ जतन‎ करून‎ भेट‎ दिल्याबद्दल किसन जाधव यांचे त्यांनी‎ आभार‎ मानले.‎ सोलापूरच्या कलेची आणि सोलापुरी चादरीची‎ ओळख अशा पद्धतीने‎ जपल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.‎ यावेळी‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे‎ ज्येष्ठ नेते‎ तथा खासदार‎ सुनील तटकरे‎ यांचाही‎ शाल, फेटा‎ व‎ पुष्पगुच्छ‎ देऊन किसन‎ जाधव यांनी सत्कार केला.‎ किसन जाधव हे‎ पूर्वी‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेसमध्ये सक्रिय‎ होते.‎ अलीकडील निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक‎ लढवून नगरसेवक‎ म्हणून‎ विजय‎ मिळविला.‎ मात्र पक्ष बदलला असला‎ तरी‎ तटकरे‎ परिवाराशी असलेले‎ जुने ऋणानुबंध त्यांनी कायम जपले‎ आहेत. त्यामुळे‎ हा सत्कार‎ कोणत्याही‎ पक्षीय राजकारणापलीकडे‎ कौटुंबिक जिव्हाळा‎ आणि‎ जुन्या‎ ऋणानुबंधांचा सन्मान म्हणून करण्यात आला. याप्रसंगी युवा‎ नेते चेतन‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, माणिक‎ कांबळे,‎ अजय‎ बिरवटकर,‎ हुलगप्पा‎ शासम, पवन बेरे,‎ वैभव प्रचंडे, वसीम‎ रंगरेज आदींची‎ उपस्थिती होती. यावेळी किसन जाधव यांनी‎ खासदार सुनील‎ तटकरे यांना‎ सोलापूर‎ शहराच्या विकासासंदर्भातील काही निवेदनेही‎ दिली.‎ महायुतीच्या‎ माध्यमातून‎ सोलापूर शहराचा‎ सर्वांगीण‎ विकास‎ होत असून, आगामी‎ काळातही सोलापूरच्या‎ विकासासाठी आवश्यक ते सहकार्य‎ करण्याची भूमिका‎ राहील,‎ असे‎ खासदार‎ सुनील‎ तटकरे यांनी‎ यावेळी‎ सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages