व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी मध्ये दहा दिवसीय प्लेसमेंट ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न
क्वांटा लीप प्रेप यांच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कोडिंग, तांत्रिक कौशल्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता तसेच प्लेसमेंटसाठी आवश्यक सर्वांगीण कौशल्ये विकसित करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना सरावाधारित उपक्रम, संवादात्मक सत्रे आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शनाद्वारे भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आले. अनुभवी प्रशिक्षक प्रभात चौबे, निखिल अवंती आणि अजिंक्य गायकवाड यांनी प्रशिक्षण सत्रे प्रभावीपणे घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांमध्ये वाढ होण्यासोबतच आगामी प्लेसमेंट संधींसाठी त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला.
शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगाच्या अपेक्षा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी संस्थेच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
या उपक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. देशमुख, अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, उपाध्यक्ष एम. एल. कटकधोंड आणि प्राचार्य प्रा. डॉ. ए. एन. गायकवाड व सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नेतृत्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुरळीतपणे पार पडले.
.png)
No comments:
Post a Comment