तर सैन्यदलाकडेही विद्यार्थ्यांनी वळावे- खा. धैर्यशील मोहिते-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

तर सैन्यदलाकडेही विद्यार्थ्यांनी वळावे- खा. धैर्यशील मोहिते-पाटील

 तर सैन्यदलाकडेही विद्यार्थ्यांनी वळावे- खा. धैर्यशील मोहिते-पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांनी केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रांकडे न वळता IAS, IPS, सैन्यदल तसेच प्रशासकीय व संरक्षण क्षेत्रातील विविध संधींचा विचार करावा. विशेषतः अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सैन्यदलात सहभागी होऊन देशसेवेचा मार्ग स्वीकारावा असे मत माढा लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
शिवरत्न स्कूल, मिलेनियम स्कूल आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची सलामी स्वीकारत त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शालेय जीवनापासूनच विविध क्षेत्रांची माहिती व योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार मोहिते-पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर १०० टक्के उपस्थिती नोंदविणाऱ्या शिक्षकांचाही त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एसएमपीचे प्राचार्य मॉन्सी मथाई यांनी स्वागतपर भाषण केले. शिवरत्न स्कूलचे प्राचार्य अल्बर्ट थारकन यांनी प्रस्तावना केली तर मिलेनियम स्कूलच्या प्राचार्या सौ. बिनो के. पॉलोस यांनी आभार मानले. यावेळी संस्थांचे संचालक, कमिटी मेंबर, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी उत्स्फूर्त सहभागाने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages