शिक्षकांच्या हितासाठी कटिबद्ध- आ. ज. मो. अभ्यंकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

शिक्षकांच्या हितासाठी कटिबद्ध- आ. ज. मो. अभ्यंकर

शिक्षकांच्या हितासाठी कटिबद्ध- आ. ज. मो. अभ्यंकर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "आपण शिक्षक आमदार या नात्याने शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत," असे प्रतिपादन मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार  ज. मो. अभ्यंकर यांनी  केल्याची माहिती डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.
याप्रसंगी कृती समितीच्या वतीने आमदार अभ्यंकर यांच्याकडे शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घालण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करणे, टीईटी (TET) सक्ती, बीएलओ (BLO) नेमणूक, इ केवायसी साठी मुदत वाढ, तसेच खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार अभ्यंकर यांनी या सर्व मागण्या आणि प्रश्न सकारात्मकतेने सोडवण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.
या कार्यक्रमाला  राज्य शिक्षक सेनेचे सरचिटणीस रमेश चौगुले,सुनील चव्हाण, आप्पाराव इटेकर, विनोद आगलावे, अब्दुल गफूर अरब, सचिन चौधरी, उल्हास बिराजदार,बरगली लांडगे, जयंत गायकवाड, चंद्रकांत साळुंके, सिद्धाराम अर्जुन, दत्तात्रय पांढरे, जावेद चांदा, मुजम्मिल शेख, शिवराज चौलगी, सुनील राऊत   यांच्यासह  संघटनांचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages