देशाच्या विकासात तरुणाने प्रामाणिकपणे योगदान द्यावे- मुकुंद पत्की
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- देशाची एकता, अखंडता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्यातील भेद विसरून आपण राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे तसेच आपल्या.कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करून देशाच्या विकासात प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे असे सांगून कार्यक्रमाचे सुनियोजन पाहून सांस्कृतिक विभागाचे तोंड भरून कौतुक केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या कै पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने आयोजित केलेल्या भारताच्या 80 व्या स्वतंत्र दिनानिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष भीमराव साठे, माजी प्राचार्य एम ए शेख, संचालिका सौ शांभवीताई कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती,संचालक अशोक येणगुरे, जुनिअर विभाग प्रमुख सौ पुनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राथमिक चे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेमी विभागाचे दिगंबर जगताप, बापूजी निंबाळकर,खंडेराव घाटगे,शिवानंद पुजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सिद्धाराम जमादार हा विद्यार्थी धावणे व लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून थोर नेत्यांचे स्मृती जागृत केल्या. यावेळी लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आदी क्रांतिकारकांच्या वेशभूषा केलेले नर्सरी वर्गातील चिमुकले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सिद्धी बाबर व वेदांती मसलेकर या विद्यार्थिनी केल्या तर आभार ज्येष्ठ शिक्षिका सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
ध्वजारोहण प्रसंगी संगीताच्या सुमधुर स्वराने सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम गायन, राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडागीत संगीत शिक्षक मयूर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
.png)
No comments:
Post a Comment