डॉ. किरण पाटील यांना रसायनशास्त्रात पीएच.डी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

डॉ. किरण पाटील यांना रसायनशास्त्रात पीएच.डी

डॉ. किरण पाटील यांना रसायनशास्त्रात पीएच.डी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथील सामान्य विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. किरण संग्राम पाटील यांना जैन विद्यापीठ, बेंगळुरू यांच्याकडून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. पाटील यांनी ‘१,२-बिस आणि १,१,२-ट्रिस-अल्काइल बोरोनेट एस्टर्सचे संश्लेषण व उपयोग’ या विषयावर संशोधन केले. डॉ. शुभांकर कुमार बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पर्यावरणपूरक, उत्प्रेरकरहित आणि पाण्याच्या सहाय्याने सेंद्रिय रासायनिक संश्लेषणाच्या अभिनव पद्धती विकसित केल्या.

त्यांच्या संशोधनावर आधारित पाच लेख रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या ‘ग्रीन केमिस्ट्री’ आणि अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘द जर्नल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री’ यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत. तसेच भारतीय पेटंट कार्यालयाने त्यांच्या तीन पेटंट अर्जांचे प्रकाशन केले आहे.

डॉ. पाटील यांनी अभियांत्रिकी व पॅरामेडिकल रसायनशास्त्र विषयावरील तीन पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाची निवड असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ‘युनिव्हर्सिटी न्यूज’ नियतकालिकातील ‘थिसिस ऑफ द मंथ’ या विशेष विभागासाठी झाली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधन कार्याबद्दल  कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ शंकर नवले तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages