अस्खलित इंग्रजीतील प्रभावी भाषणाने ज्योती वाघमारे यांनी गाजवली राज्यसभा
आपल्या भाषणाच्या प्रारंभी डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्राचे नेते, महिला सक्षमीकरणाचे प्रणेते आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
“चुलीच्या चौकटीतून बाहेर पडलेली आजची नारी केवळ घरच नाही, तर देशाची अर्थव्यवस्थाही समर्थपणे चालवत आहे,” असा संदेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतासह संपूर्ण जगाला देत असल्याचे डॉ. वाघमारे यांनी नमूद केले.
या विधेयकाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, तब्बल १२५ वर्षे जुन्या वसाहतवादी कायद्यांचा अंत करून भारताला भविष्यासाठी सज्ज करणारा हा ऐतिहासिक टप्पा आहे. १८९१ पासून २०२६ पर्यंतचा प्रवास या विधेयकातून अधोरेखित होतो. कागदापासून डिजिटल व्यवस्थेकडे, वसाहतकालीन बँकिंगपासून आधुनिक बँकिंगकडे आणि डिजिटल व्यवहारांपासून डिजिटल न्यायव्यवस्थेकडे नेणारा हा महत्त्वपूर्ण पूल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे विधेयक केवळ जुन्या कायद्याचे रूपांतर नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नव्या भारताचा’ आत्मविश्वास आणि आधुनिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताची वाटचाल दर्शवणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही डॉ. वाघमारे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
राज्यसभेतील त्यांच्या प्रभावी इंग्रजी भाषणाची शैली, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आणि आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्वामुळे सभागृहात त्यांचे विशेष कौतुक झाले.

No comments:
Post a Comment