शहरातील महिला व मुलींसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण कोर्स - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

शहरातील महिला व मुलींसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण कोर्स

 शहरातील महिला व मुलींसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण कोर्स 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत.शहरातील महिला व मुलींसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती समितीच्या सभापती निर्मला जंगम यांनी दिली.
        शहरातील महिला, मुली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास तसेच रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. समितीच्या सभापती निर्मला जंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिला व मुलींसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण, ए आय कोर्स , पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि मनपा शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसविण्यास मंजुरी देण्यात आली.तसेच सोमपा प्रसूतिगृह, मनपा माध्यमिक शाळा आणि महानगरपालिका इमारतीत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत.सन २०२६-२७ मध्ये पात्र व गरजू महिला आणि मुलींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. एकल महिला व त्यांच्या मुलींना तसेच २०२५-२६ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ ते २५ वयोगटातील मुलींना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
        मनपा प्राथमिक शाळांमधील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याचाही निर्णय घेण्यात आला. याशिवाय समितीचे सर्व सदस्य मनपा शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची पाहणी करणार आहेत.महिलांना स्वावलंबी करण्यासोबतच मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत आगामी काळातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सभापती निर्मला जंगम यांनी सांगितले. 
      या बैठकीस सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, वंदना गायकवाड, मृण्मयी गवळी, पूजा वाडेकर, श्वेता खरात - खांडेकर, सुमन चाबुकस्वार आणि सफिया चौधरी ह्या सदस्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages