असंघटित महिला कामगारांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची केंद्राकडे ठोस मागणी
यावेळी त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिलांना किमान वेतनाची हमी, आरोग्यविषयक सर्व सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आवश्यक शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, अशी मागणी केली. तसेच कामगार महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणा घरे उभारण्याची गरज अधोरेखित करत, त्यामुळे महिलांना निर्धास्तपणे काम करता येईल आणि बालकांचे संगोपनही सुरक्षित वातावरणात होईल, असे त्यांनी सांगितले.
असंघटित क्षेत्रात अनेक महिला विविध प्रकारच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक शोषणाला सामोऱ्या जात असल्याचे नमूद करत, अशा शोषणाला आळा घालण्यासाठी कठोर धोरण, प्रभावी कायदेशीर संरक्षण आणि काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे प्रा. डॉ. वाघमारे यांनी सांगितले. महिलांना अधिक सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले.
महिलांच्या सन्मान, सुरक्षितता, रोजगारातील समान संधी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण आखून प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे देशातील लाखो असंघटित महिला कामगारांच्या प्रश्नांना राज्यसभेत प्रभावीपणे वाचा फुटली.

No comments:
Post a Comment