श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या सन २०२६-२७ च्या नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या सन २०२६-२७ च्या नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

 श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या सन २०२६-२७ च्या नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजबांधव कै. नारायण नागप्पा गडगी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्री गणेश पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

कार्यक्रमास ज्येष्ठ समाजबांधव व ज्ञाती संस्थेचे माजी सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा तसेच शिक्षण संस्थेचे माजी सचिव अनिल धुळम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शशिकांत नादरगी, समर्थ बुगडी, श्रीनिवास धुळम, समाजभगिनी बालमणी कस्सा यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

फाउंडेशनचे सल्लागार शंकर बटगिरी यांनी प्रस्तावना करून समाजबांधव व तरुणांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर सल्लागार श्रीनिवास बंदगी यांनी गेल्या १४ वर्षांपासून फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या एकमताने व उत्साही वातावरणात सन २०२६-२७ या वर्षासाठी फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रेसिडेंट म्हणून सुनिल अ. धुळम, व्हाईस प्रेसिडेंट नरसिंग बु. म्हंता, अध्यक्ष आनंद रेब्बा, सचिव लखन व्यं. मिठ्ठा, सहसचिव आकाश सानी, खजिनदार संजय ल. कुनी यांची निवड झाली.

उपाध्यक्ष म्हणून शिवराज धुळम, कार्तिक चिकनी, नितीन बंदगी, नागेश गडगी, नवल बटगिरी, रमेश म्हंताटी, नितेश धुळम, चंद्रशेखर बिनगुंडी, सुनिल रेब्बा, प्रविण बंदगी, प्रशांत आरकेल, विशाल कस्सा आणि गोविंद बंदगी यांची निवड करण्यात आली.

प्रसिद्धी प्रमुख म्हणून ध्यानेश्वर रेब्बा, नील धुळम, महेश सानी, प्रसाद माचर्ला, नरेश द्यावरकोंडा, अभिषेक दंडगळ, आशिष धुळम, राजू आवाल, समर्थ मुटकिरी, विनायक कामुर्ती, अशोक आवाल आणि महेश म्हंता यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष लखन रुमांडला यांनी उपस्थित मान्यवर, समाजबांधव आणि नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages