करमाळ्यात माळढोक अभयारण्यात घोरपडीची शिकार; दोघांवर वनविभागाची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

करमाळ्यात माळढोक अभयारण्यात घोरपडीची शिकार; दोघांवर वनविभागाची कारवाई

करमाळ्यात माळढोक अभयारण्यात घोरपडीची शिकार; दोघांवर वनविभागाची कारवाई




करमाळा (कटूसत्य वृत्त):- माळढोक पक्षी अभयारण्याच्या हूलगेवाडी परिसरातील राखीव वनक्षेत्रात घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने दोघांवर कारवाई केली आहे. वनविभागाच्या गस्ती दरम्यान दोघे जण शिकार करताना आढळून आले असून त्यांच्या ताब्यात जखमी अवस्थेतील जिवंत घोरपड तसेच तीन जाळी आढळून आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची वन कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
माळढोक पक्षी अभयारण्यांतर्गत मौजे हूलगेवाडी, गट क्रमांक ३२, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे ९ ऑगस्ट रोजी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नियमित गस्त घालत होते. यावेळी दुपारच्या सुमारास संबंधित परिसरात घोरपडीची शिकार केल्याचे वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
घटनास्थळी पाहणी केली असता अक्षय शिवदास गोरे (वय अंदाजे ३०, रा. वंजारवाडी, ता. करमाळा) आणि सुरेश रामदास गायकवाड (वय अंदाजे ४०, रा. वंजारवाडी, ता. करमाळा) हे दोघे अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात शिकार करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यात जिवंत मात्र जखमी अवस्थेतील घोरपड आढळून आली. तसेच तीन जाळीही आढळून आल्याने वनविभागाने घोरपड व जाळी जप्त केली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना १० ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, करमाळा यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माळढोक पक्षी अभयारण्य, करमाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग पुणे केशव वाबळे आणि सहाय्यक वनसंरक्षक, माळढोक पक्षी अभयारण्य प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी साळुंखे, वनपाल अनंता कारंडे, पद्मिनी कांबळे, वनरक्षक माधुरी जाधव, प्रदीप शिंदे, बबन दहातोंडे, नवनाथ दळवी तसेच सर्व वनमजूर व रेंज स्टाफ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि अभयारण्यांचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वन्यजीवांशी संबंधित अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages