आ. अभिजीत पाटील यांचा श्री विठ्ठल कारखान्यावर सत्कार, अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, आपण केलेला सत्कार मी नम्रपुर्वक स्विकारत असून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आपले सर्वांच्या आशिर्वादाने या कारखान्याचा चेअरमन व आमदार झालेलो आहे. यावर्षीचा वाढदिवस अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील सर्वात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या टाईम्स स्क्वेअर अर या ठिकाणी करणेत आला, हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण होता. सामाजिक बांधीलकी जोपासत प्रत्येक गांवामध्ये रक्तदान शिबीर, सर्वरोग निदान शिबीर, वृक्ष लागवड, शालेय साहित्य वाटप व महिला आरोग्य शिबीर आयोजित करणेत आलेमुळे लोकांना आरोग्याची सेवा उपलब्ध करुन दिली. आपलेकडे दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा उजनी धरण पुर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्त लक्ष देवून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. तसेच माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही व या कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देणेसाठी मी कटीबध्द आहे, अशी त्यांनी भावना व्यक्त केली.
कै.आमदार भारतनाना भालके यांनी २० वर्षापुर्वी कृषि महाविद्यालय स्थापन करणेचे पाहिलेले स्वप्न आज आपण पुर्ण करत असून श्री विठ्ठल कृषि महाविद्यालयाची सुरुवात करित आहोत. कारखाना कार्यस्थळावर इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय करणेचा मानस असून सिनिअर कॉलेज, आय. टी. आय. कॉलेज स्थापन करणेचे प्रस्ताव सादर करणेत आलेले आहेत, सदर शैक्षणिक संस्थामधून भागातील सर्व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेतील.
अमेरिका अभ्यास दौऱ्यासाठी देशभरातून ३२ आमदारांची निवड करणेत आलेली असून महाराष्ट्रातून ११ आमदारांची निवड करणेत आलेली होती. या अभ्यास दौऱ्यामध्ये अमेरिकेतील शिक्षण पध्दती, आरोग्य सेवा, निवडणूक प्रक्रिया, शेती विषयक बाबींची माहिती सांगीतली, सदर अभ्यास दौऱ्या दरम्यान महाराष्ट्रातील येरमाळा येथील डॉ. बालाजी आगलावे यांचेशी संवाद होवून त्यांची अमेरिकेमध्ये १८०० एकर जमीन आहे. सदर जमीनमध्ये मोसंबी, संत्रे, ऊस, आंबा, सिताफळ या सारख्या पिकांवर संशोधन करुन त्यांनी पेटंट मिळवले आहे. तसेच त्यांची स्वतःची कंपनी असून त्यांचे बरोबर आपले कृषि महाविद्यालयाचे टेक्नॉलॉजी एक्सचेंज अॅग्रीमेंट केले जाणार आहे. सदर अॅग्रीमेंटमध्ये आपले कृषि महाविद्यालयातून पदवी पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये नोकरी देवून मास्टर करणेसाठी संपुर्ण खर्च करणेची तयारी त्यांनी दाखविलेली आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी धाडस केल्याशिवाय मोठे स्वप्न पहाता येत नाहीत, त्यामुळे मोठे स्वप्न पाहावे ते स्वप्न पुर्ण करणेची जबाबदारी आमची आहे. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की ती पुर्ण होवू शकत नाही. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांना मोठे स्वप्न पाहणेसाठी प्रवृत्त करावे,
कारखाना व कृषि महाविद्यालय यांचे वतीने एकरी १०० टन उत्पादन घेणेसाठी शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गांवामध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करावीत. ऊस लागवड करणेसाठी त्यांना प्रोत्साहित करावे. ऊस उत्पादन चांगल्या पध्दतीने घेवून यावर्षी साखरेचे दर वाढल्याने ऊसाला चांगला दर मिळणार आहे. आपले कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने गळीत जास्त होणार आहे. श्री विठ्ठल कारखान्यावर विश्वास निर्माण झालेला असून आपणास जादा प्रमाणात ऊस गाळपास मिळेल, त्यामुळे या संस्थेच्या हितास बाधा येवू देणार नाही, सर्वांनी येणारा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी सहकार्य करावे.
स्वागत व प्रस्ताविकात बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीतील कारखाना व शाळा कॉलेज यांचे वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आलेले असून या सर्व उपक्रमाचा एकत्रित आढावा म्हणजे सामाजिक, शैक्षणीक व सांस्कृतिक उपक्रमांची मालिका राबविणेत आली. त्यामध्ये विदयार्थ्यांना खाऊ, गणवेश व शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व श्री नागन्नाथ मुकबधीर विद्यालय बाभुळगांव येथील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन, रक्तदान, नेत्ररोग तपासणी,उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर, महिला आरोग्य शिबीर व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. आपल्या नेवृत्वाला आमचे सदैव सहकार्य, विश्वास आणि साथ राहील याची ग्वाही देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. धनंजय आर्वे यांनी केले तर आभार नागटिळक यांनी मानले.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासहोब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, विठ्ठल रणदिवे, महेश खटके, विठ्ठल पाटील, दशरथ जाधव, अशोक तोंडले, धनाजी खरात, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, श्री विठ्ठल प्रशाला व श्री विठ्ठल कृषि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी, सभासद, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment