दहिगांव दिगंबर जैन मंदिर चोरी प्रकरणातील धागे दोरे नातेपुते पोलीसांच्या हाती
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दहिगांव ता. माळशिरस येथील श्री क्षेत्र १००८ दिगांबर जैन मंदिरात दि. ५ च्या रात्री ते ६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीच्या घटनेचा तातडीने सखोल तपास करून आरोपींचे धागे दोरे नातेपुते पोलीस प्रशासनाच्या हाती लागले आहेत.
श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगांव ता. माळशिरस या ठिकणी अज्ञात चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करून चोरीची गंभीर घटना घडवून आणली घटनेमध्ये मंदिरातील तीन चांदीच्या मूर्ती, चांदीचे छत्र, सोन्याचा मुलामा दिलेला कळसाचा बेस तसेच दानपेटी व काचेची दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम असा पाच ते आठ लाख किमतीचा मूल्यवान ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. त्यामुळे जैन समाजाच्या भावनिक भावना दुखावल्या गेल्या होत्या सदर घडलेल्या चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी व नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लावून पोलिसांची वेगवेगळी तपास पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना केली आहेत. याच दरम्यान तपासी पथकांना या मंदीरामध्ये झालेल्या धाडसी चोरीचे दागेदोरे लागले. ही पथके गेल्या काही दिवसापासून चोरट्यांच्या मार्गावर रवाना झाली असून, चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासी पथकांची शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे
श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगांव ता. माळशिरस या ठिकणी
या मंदीर चोरीतील चोरट्यांच्या लवकरच मुसक्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रशासनाकडून आवळल्या जातील

No comments:
Post a Comment