जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत स्वतंत्र दिन साजरा
कसबे तडवळे(कटूसत्य वृत्त):-
.दि.15 ऑगस्ट 2026 हा 80 वा भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा जि.प.आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथे मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत दि.9 ऑगस्ट 2026 पासून शाळेत तिरंगारॅली,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,तिरंगा प्रतिज्ञा . तंबाखुमुक्त शपथ , प्रभातफेरी , देशभक्ती गीतावर संगीत कवायत असे विविध उपक्रमाने हे अभियान यशस्वी पणे राबविले गेले.त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने या शाळेतील तडवळा पॅटर्न अंतर्गत सन 2025-26 मध्ये इयत्ता चौथी ,पाचवी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 138 पात्र झालेल्या विद्यार्चीनीपैकी इ इयत्ता चौथीचे आठ,पाचवी तेवीस तर सातवी सतरा असे एकूण अठ्ठेचाळीस शिष्यावृत्ती धारक विद्यार्थीनींचे मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा,शाल,पुष्पहार आणि शिक्षण प्रेमी नागरिक ,पालकांच्या व शाळेच्या वतीने तब्बल एक लाख रु रोख बक्षीस प्रत्येकी 2100/- रु. देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी या सत्कार सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे,जिल्हा परिषद सदस्य संजय लोेखंडे, ढोकी पोलिस स्टेशनचे पो.नि हजारे,धाराशिव क्राईम ब्रँच च्या साधना जानराव,पं स स. जगन्नाथ विभूते,सोसायटीचे चेअरमन संजयजी वाघ,शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद उपसरपंच हारून शेख , ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके ,यांच्या शुभहस्ते विद्यार्थीनींना सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य लोखंडे साहेबांनी शाळेसाठी पंचेवीस लाखाचे वाचनालय व अभ्यासिका देण्याचे तर शिक्षक आमदार मा.विक्रम काळे यांनी तेहतीस हजाराचे ग्रंथात्मक पुस्तक देण्याचे घोषीत केले.मा.हजारे, तेजेस भालेराव,तडवळा पॅटर्न चे जनक जगन्नाथ धायगुडे,साधना जानराव व इतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थीनींचे कौतुक करत शाळेचे व शाळेच्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
तसेच धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत नासा या आंतरराष्ट्रीय विमान सहलीसाठी निवड झालेल्या इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमारी मृत्युंजय महेश लांडगे हिचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग तनमोर यांनी केले या कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले .
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जमाले,मनिषा गावखरे,ललिता हिंगमिरे,आशा निंबाळकर, संभाजी पाटील, सुभाष धनके, चांदणी निकाळजे ,मिरा पवार या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी पार शिक्षक यांनी पार पाडला.
.jpg)
No comments:
Post a Comment