नेताजी शिक्षण संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

नेताजी शिक्षण संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

 नेताजी शिक्षण संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   श्रमजीवी नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बालक मंदिर, प्राथमिक शाळा,इंग्रजी माध्यम शाळा, माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी सातलिंगप्पा शिरुर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले , प्राचार्य रविशंकर कुंभार , मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका अश्विनी गंगूल , मेजर सागर सुर्यवंशी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी साधना तावसकर ,   रोहिणी नंदरगी , दत्तात्रय रेड्डी, पूनम काशीद, नरेश बुरेल, श्रेयस शिरुर,  पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, संविधान, कवायत संचलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम , लेझीम सॉंग , मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू आदी देशभक्तीपर गीते सादर केली. स्वरा चाळक , ईशा चव्हाण, राधिका सावळे , आकाश कस्तुरी, अक्षरा पासूल, अभिषेक डोंगराजे, अंजली तावसकर, उमा बिटला, कांचन शिंदे, सपना कंटली, स्वाती ठोंबरे विद्यार्थ्यांनी भाषण केले.यावेळी इयत्ता दहावी व बारावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविलेल्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. पी. नकाते यांच्याकडून सृष्टी बोरामणी, यशोदा पुजारी, संतोष खराडे या विद्यार्थ्यांना जनाई मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले याच्याकडून सृष्टी बोरामणी, विजयालक्ष्मी देगील, ओंकार दावणे, अंकिता खोकले, आयेशा माकानदार या विद्यार्थ्यांना शिवकला पुरस्कार देण्यात आला. दहावीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सृष्टी बोरामणी व इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या ओंकार दावणे याना कुंभार परिवाच्यावतीने रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शिवानंद पुजारी यांच्याकडून  सृष्टी बोरामणी महासिद्ध विद्या प्रतिष्ठान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातलिंगप्पा शिरुर यांनी कै.शिवकुमार सातलिंग शिरुर यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत गणित व विज्ञान विषयात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी पाच हजार एक रुपयाचा रोख बक्षिसे दरवर्षी देण्याचा जाहीर केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले. यावेळी नेताजी शिक्षण संकुलातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages