भंडारकवठे येथे सोमवारी श्री अमरसिद्ध मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

भंडारकवठे येथे सोमवारी श्री अमरसिद्ध मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना

भंडारकवठे येथे सोमवारी श्री अमरसिद्ध मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना



भंडारकवठे (कटूसत्य वृत्त):-    दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे सोमवार दि.१७ ऑगस्ट रोजी श्री महासिद्ध मंदिरात श्री अमरसिद्ध देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दि.१६ व १७ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१६ रोजी सकाळी सात वाजता कोल्हापूर येथे बनविण्यात आलेल्या मूर्तीला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील सिद्धपुरुष श्री वीर मलकारसिद्ध मंदिरात धार्मिक विधी होणार आहे.तदनंतर मूर्तीचे भंडारकवठेकडे प्रस्थान होणार आहे.
रविवार दि.१६ रोजी सायंकाळी पाच वाजता श्री अमरसिद्ध देवाच्या नवीन मूर्तीची सवाद्य मिरवणूक श्री हनुमान मंदिरापासून श्री महासिद्ध व श्री अमरसिद्ध मंदिराकडे निघणार आहे तदनंतर महाअभिषेक, पूजा अर्चा, मंत्रोच्चार, संकल्प, देवतेचे आवाहन कार्यक्रम आदी विविध कार्यक्रम होणार आहे तसेच रात्रभर भजन  व कन्नड ढोलकी गायनाचा कार्यक्रम, जागरण आणि नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.१७ रोजी पहाटे पाच वाजता पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने महासिद्ध चिक्कवडियार, अमरसिद्ध देवाचे पुजारी धोंडप्पा अजावडियार, सिद्ध संप्रदायाचे पुरोहितकार तथा महादेव पुजारी, रमेश  फुलारी, विठ्ठल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्री अमरसिद्ध देवाच्या मुर्तीची महाअभिषेक, पूजाअर्चा, आराधना व विविध धार्मिक विधीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी  उपस्थित राहून श्री अमरसिद्ध देवाचे दर्शन आशिर्वाद तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 *चौकट*  
*सिद्ध परंपरा अख्यायिका* 

गेल्या ९०० वर्षांपासून मानकरी विठ्ठल पाटील परिवाराने श्री अमरसिद्ध देवाची पूजा-अर्चा अखंडितपणे करीत आहेत.सिद्ध परंपरेतील श्री महासिद्ध आणि गौरादेवी यांचे अमरसिद्ध, योगी मल्लप्पा, मळी मल्लप्पा वडिया आणि अवधूत वडिया आदी चार धर्म पुत्रांची अख्यायिका आहे. श्री अमरसिद्ध हे ब्रह्मचारी सिद्धपुरुष योगी असल्याने तपश्चर्येतून लोककल्याणकारी कार्य केल्याचे हे भक्तांच्या श्रद्धेतून दिसते.पुढे त्यांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी श्री अमरसिद्ध देवांनी गावातील पाटीलकी व वतनाचा अधिकार विठ्ठल पाटील यांच्या पूर्वजांकडे सोपविल्याचे सांगण्यात येते.तेव्हा पासून आजतागायत मानकरी पाटील परिवाराने श्री अमरसिद्ध देवाची पूजा-अर्चा परंपरेने चालू ठेवली आहे. पहिल्या व शेवटच्या श्रावणी सोमवारी, दीपावली, गुढीपाडवा व दोड्डहब्बा आदी महत्त्वाच्या दिवशी  श्री अमरसिद्ध देवाची मूर्ती  श्री महासिद्ध मंदिरात दर्शनासाठी आणली जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages