शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी भित्तिपत्रके साकारावीत-शांभवी कल्याणशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी भित्तिपत्रके साकारावीत-शांभवी कल्याणशेट्टी

 शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी  भित्तिपत्रके साकारावीत-शांभवी कल्याणशेट्टी





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- शाळा महाविद्यालयातील प्रसिद्धी फलक तसेच सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर माहिती व जनजागृतीचे साधन म्हणून लावल्या जाणाऱ्या भित्तिपत्रकांना महत्त्व प्राप्त झाले आहे एखाद्या विशिष्ट विषयाची माहिती आकर्षक पद्धतीने लोकांपर्यंत तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भित्तिपत्रक महत्त्वाचे असते. म्हणून  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शाळा महाविद्यालयातून शिक्षकांनी भित्तिपत्रके साकारली पाहिजेत असे प्रतिपादन जि प सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त भित्तिपत्रकाचे  अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. समन्वयक पुनम कोकळगी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भित्तिपत्रकामध्ये विषयानुसार लेख, कविता, घोषवाक्ये, चित्रे, माहिती, सुविचार इत्यादींचा समावेश केला पाहिजे
भित्तिपत्रकाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, लेखनकौशल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे असा असल्यामुळे भित्तिपत्रके लक्षवेधी ठरतात.

पुनम कोकळगी म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण, विज्ञान अशा विविध विषयांवर भित्तिपत्रके काढण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.  आजच्या डिजिटल युगात देखील भित्तिपत्रकाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे “भित्तिपत्रक म्हणजे ज्ञान, कल्पकता आणि जनजागृती यांचा सुंदर संगम” असे म्हणता येईल.

कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा भीम सोनकांबळे यांनी केले सूत्रसंचलन प्रा सौरभ भस्मे यांनी केले तर आभार प्राध्यापिका मनीषा शिंदे यांनी मानले यशस्वीतेसाठी प्राध्यापिका सोनाली कटकधोंड यांनी प्रयत्न केले.

चौकट-

भित्तिपत्रकात शेतकऱ्यांच्या व्यथा अर्थव्यवस्था अन युवकांची व्यसनाधीनता

भित्तिपत्रकातून कला विभागातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर अर्थव्यवस्थेवर वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी भाष्य केले व विज्ञान विभागाच्या भित्तिपत्रकातून व्यसनाधीनतेवर पोस्टर तयार करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages