अनंत चैतन्य प्रशालेत ८० वा स्वातंत्र्योत्सव उत्साहात साजरा
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हन्नूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सिद्राम पुजारी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण केले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या तसेच इयत्ता पाचवी ते नववीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध मान्यवरांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रोख बक्षिसांनी गौरव करण्यात आला.
प्रशालेच्या विद्यार्थिनी जरीना पटेल,दिव्या निकम व लक्ष्मी धर्मसाले यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सेमी इंग्रजी विद्यालयातील अवनिश पाटील, सृष्टी सावळे, महेंद्र भरमशेट्टी, प्रियांशी कोरे व प्रणाली कोरे या विद्यार्थ्यांनीही प्रभावी भाषणे सादर केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सुंदर कवायत व नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विविध देशभक्तांच्या वेशभूषेतील बालचमुने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, हन्नूरच्या सरपंच सोनालीताई तळवार, ग्रामपंचायत सदस्य, माजी प्राचार्य अशोक दंतकाळे, माजी प्राचार्य विलास बिराजदार, शरणप्पा हेगडे,अर्जुन जळकोटे,सलीम मुल्ला, ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, सशस्त्र सीमा सुरक्षा बल हन्नूरचे जवान, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राठोड व शिक्षकवृंद, प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे, पर्यवेक्षक सुरेश जाधव, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सेमी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, सेमी इंग्रजी व प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब काळे यांनी केले. सूत्रसंचालन मल्लम्मा चपळगाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नाली जमदाडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment